औरंगाबाद : सिटी चौक परिसरातील एका आठवर्षीय बालकावर अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्याने ‘तुला जादू दाखवितो’ असे सांगत घेऊन गेला, त्यानंतर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 14 जून रोजी रात्री सव्वादाहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलिसांनी काझी मुनीर काझी तौफिक वय 23, रा. हिमायतबाग याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने काझी याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सिटी चौकातील एका बँकसमोर असलेल्या इमारतीत काझी मुनीर याने आठ वर्षीय बालकाला तुला जादू दाखवितो असे सांगत घेऊन गेला होता. त्यानंतर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बालकाने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका केली होती.
24 जुलै रोजी अचानक काझी मुनीर हा सिटीचौक भागात बालकाला दिसला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी सिटी चौक पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी काझी मुनीर याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मुजगुले हे करत आहेत. सुनावणीदरम्यान सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी सरकारपक्षातर्फे काम पहिले.