व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबईकरांची वाट लावणारा हा अर्थसंकल्प; अतुल भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेचा 2022-2023 या आर्थिक वर्षसााठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावरून भाजपकडून आता टीका होऊ लागली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांची वाट लावणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज मांडण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. खरे पहिले तर या अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. हा अर्थसंकल्प बोगस स्वरूपाचा आहे.

मुंबई महानगरपालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. या आजच्या अर्थसंकल्पातून काहीही दिलेले नाही. सर्वसामान्य मुंबईकर तसेच झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या लोकांच्या तोंडाला अर्थसंकल्पातून पाने पुसण्यात आलेली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प मुंबईकरांची वाट लावणारा असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे/