Thursday, October 6, 2022

Buy now

मुंबईत आयकर विभागाच्या कारवाईवरून अतुल भातखळकरांचे ‘ते’ ट्विट; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडी आणि आयकर विभागाच्यावतीने राज्यात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यावरून आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत सवाल उपस्थित केला आहे. “अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे???:, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, सध्या आयकर विभागाच्यावतीने राज्यात ठीक ठिकाणी कारवाई केली जात आहे. यामध्ये आज अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे???, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

यावेळी अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साडह्ला. यावलेली ते म्हणाले की, राज्यात सध्या महाभकास आघाडीचे सरकार आहे. आणि पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊतच म्हणाले होते कि मी सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर काढणार. कुठे गेले ते पुरावे? काय झाले त्यांच्या पुराव्याचे याची उत्तरे आता का राऊत देत नाहीत?, असे अनेक प्रश्न यावेळी भातखळकर यांनी उपस्थित केले.