कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कार्वे मध्ये अतुल भोसले पॅनेलचा दणदणीत विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यात सगळीकडे ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनल विजयी झाले आहे. अतुल भोसले यांच्या पॅनेलने 10/7 असा दमदार विजय मिळवला आहे.

एकूण 17 वॉर्ड असलेल्या गावात अतुल भोसलेंच्या भाजपने 10 जागांवर विजय मिळवला तर कॉंग्रेसला 7 जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष तानाजी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी प्रथम कराड तालुक्यातील सर्व मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, कराड दक्षिण मतदारसंघातील शेरे, शेणोली, कार्वे, खुबी अशा मोठ्या ग्रामपंचायती मध्ये अतुल भोसले पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. गेल्या 7-8 महिन्यापासून कोरोना काळात अतुल भोसले, सुरेश भोसले यांनी केलेल्या कामाची ही प्रचीती आहे असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment