सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खटाव तालुक्यातील गोरेगांव चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस 8 तासांत अटक करण्यात औंध पोलिसांना यश आले आहे. संबंधित आरोपीस सांगली जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून आरोपीकडून फलटण पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औंध पोलीस ठाणे हद्दीत गोरेगाव (वांगी), ता. खटाव येथील फिर्यादी ऊसतोड कामगार अशोक देवीदास चौरे हे दि. ०७/०३/२०२३ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आपलया कोपटात सुमारे २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल चार्जिंगला लावून झोपले होते. यावेळी दुसऱ्या दिवशी ०८ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. खबरीवरुन औंध पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ८१ / २०२३ भा.दं.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन आरोपी अभिषेक फ्रेसखान पवार यास आष्टा ता. वाळवा, जि. सांगली येथून ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीडून एक मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. मोटार सायकलबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६५/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा ही उघडकीस आणला आहे.