Wednesday, June 7, 2023

औरंगाबाद: तीन तासात संपल्या 6 हजार लस; सोमवारी लसीकरण तळ्यात मळ्यातच

औरंगाबाद : सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोणाची दुसरी लाट ओसरत असताना लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे. शनिवारी अवघ्या तीन तासातच सहा हजार लसी संपल्या होत्या यामुळे बऱ्याच नागरिकांना लसी विना घरी जावे लागले.

सुमारे एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांची दुसऱ्या डोस साठी वेटिंग असताना महापालिकेला सहा 6 हजार लस्सी मिळाल्या होत्या. दरम्यान मिळालेल्या लसींचे शहरात 39 केंद्र व लसीकरण करण्यात आले. महापालिकेने लाखो लसींची मागणी केलेली असताना कधी 5 हजार कधीच 7 हजार लसी मिळत आहेत. यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्र जवळ नंबर लावूनही लसी मिळत नसल्यामुळे त्यांना निराशेने घरी परतावे लागते. आरोग्य विभागातर्फे किती लस आणि केव्हा येणार हे सांगितल्या जात नाही. यामुळे रोजच्या लसीकरणाचे नियोजन करणे अवघड जाते. त्याच प्रमाणे शुक्रवारीही लस मिळणार एवढाच निरोप देण्यात आला होता. शुक्रवारी औरंगाबाद विभागासाठी 33 हजार लसीचा साठा देण्यात आला. त्यामधील पाच ते सात हजार लस महापालिकेला मिळाले. आणि शनिवारी सकाळी दहा वाजता महापालिकेला सहा हजार लस मिळाल्या त्या ही तीन तासातच संपल्या.

सकाळी सहा हजार लस मिळताच महापालिकेने शहरासाठी 39 केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. काही केंद्रावर 100, काही ठिकाणी 150 व 200 असे डोस देण्यात आले होते. आपल्या शहरात सुमारे एक लाख नागरिक दुसऱ्या डोससाठी वेटिंगवर आहेत परंतु सोमवारी लस मिळेल की नाही सांगता येत नाही असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले.