औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनाच्या 20 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 7,तर ग्रामीण भागातील 13 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 927 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 18 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये शहरातील 6 आणि ग्रामीण मधील 12 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील
चिकलठाणा 1, औरंगपुरा 1, इंदिरानगर 1, हर्सूल जेल 2, अन्य 2 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात औरंगाबाद 2, फुलंब्री 1, कन्नड 1, खुलताबाद 1, सिल्लोड 1, वैजापूर 7 रुग्ण आढळले आहे. पैठण येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.