औरंगाबाद दुचाकी चोरीचे सत्र सुरूच; एका बुलेटसह सहा दुचाकी लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ सुरूच असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून एका बुलेटसह अर्धा डजन दुचाकी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊन लागल्यापासून शहरामध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

शेख जुबेर शेख चाँद (वय23) रा.हमालवाडा,रेल्वेस्टेशन परिसर यांची बुलेट क्रमांक (एमएच-20-एफए-4786) चोरट्याने 18 जून रोजी घराजवळून चोरून नेली. शेख जमीर शेख जहरूद्दीन (वय 37) रा.मोतीकारंजा यांची दुचाकी क्रमांक (एमएच-20-डीझेड-2888) चोरट्याने 16 मे रोजी जामा मशिदजवळून चोरून नेली. अन्वर खान अब्दुल रहेमान खान (वय 40) रा.शादाबनगर,मिटमिटा यांची दुचाकी क्रमांक (एमएच-20-बीयू-1799) चोरट्याने 21जून रोजी घराजवळून चोरून नेली.

अप्पासाहेब प्रल्हाद चव्हाण (वय 33), रा.पिसादेवी यांची दुचाकी क्रमांक (एमएच-20-ईटी-0681) चोरट्याने 21 जून रोजी कडा ऑफीस समोरून चोरून नेली. चंद्रभान सुर्यभान वाहुळ (वय 41) रा.नारेगाव यांची दुचाकी क्रमांक (एमएच-20-बीएफ-3442) चोरट्याने 20 जून रोजी एपीआय कॉर्नरजवळून चोरून नेली. मिलिंद प्रल्हाद मगरे (वय 32) रा.जहागिरदार कॉलनी यांची दुचाकी क्रमांक (एमएच-20 ईएन-3269) चोरट्याने 20 जून रोजी घराजवळून चोरून नेली. शहराच्या विविध भागातून तब्बल 6 दुचाकी लंपास केल्याने चोरट्याविरूध्द सातारा, सिटीचौक,छावणी, पुंडलिकनगर,एमआयडीसी सिडको,वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment