औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार शहरातील कोरोनाबधितांची संख्या 743 वर गेली आहे. शहरात आज पुन्हा 55 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबधितांची संख्या 743 वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
शहराचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे चिंता देखील वाढताना दिसत आहे. त्यात कालपर्यंतचा कोरोनाबधितांची संख्या पाहता 677 वर गेली होती. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार 55 कोरोनाबधितांची भर पडली.
यामध्ये भीमनगर भावसिंगपुरा १५, शिवपुरी पडेगाव १, उस्मानपुरा ७, सिल्कमिल कॉलनी १, कांचनवाडी १, नारळीबाग १, आरटीओ ऑफिस २, गरमपाणी १, बन्सीलाल नगर १, सातारा परिसर २, सातारा ग्रामपंचायत ५, खंडोबा मंदिर जवळ सातारा ग्रामपंचायत १, संजयनगर मुकुंदवाडी ३, हुसेन कॉलनी गारखेडा २, दत्त नगर पाच नंबर गल्ली १, न्याय नगर २, पुंडलीकनगर १, गुरूनगर १, न्यू नंदनवन कॉलनी १, गारखेडा १ , शहानुरवाडी १, पंचशील दरवाजा किलेअर्क १, बेगमपुरा १ व अन्य भागातील २ अशा ५५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
दरम्यान, काल बुधवारी दिवसभरात ३४ रुग्णांची भर पडली तर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. रविवार पासून आतापर्यंत शहरात तब्बल सात रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१० रूग बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४३ वर पोहोचली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.