औंरगाबादेत कोरोनाचा कहर; जिल्ह्यात नवीन 17 रुग्णांची भर, रुग्णसंख्या 495 वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद शहरात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या 495 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना चाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 477 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पुन्हा रात्री उशीरा 30 वर्षीय करीम कॉलनी, रोशन गेट येथील महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या 100 रुग्णांची भर पडल्याने काल (दि.8 रोजी) एकूण 478 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर आज (दि.9 रोजी) सकाळी नव्याने 17 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 495 झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

आज वाढलेले शहरातील कोरोनाबाधित संजयनगर, मुकुंदवाडी (६), कटकट गेट (२), बाबर कॉलनी (४), आसेफीया कॉलनी (१), सिल्क मिल कॉलनी (१), रामनगर-मुकुंदवाडी (१), भवानीनगर, जुना मोंढा (२) या परिसरातील आहेत. यामध्ये सात पुरूष आणि 10 महिलांचा समावेश असल्याचेही रूग्णालयाने कळवले आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment