औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 500 च्या घरात

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या 468 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना चाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 90 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 468 झाली आहे. यातील 12 जणांचे मृत्यू झाले असुन 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी सापडलेल्या रुग्णामध्ये एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01), ध्यान नगर, गारखेडा (01), एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (01) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

You might also like