मोठ्या आवाजात गाणे लावल्याच्या वादातून तरुणाने चौघांना घेतला चावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाळूज : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका तरुणाने चार जणांना चावा घेतला आहे. हा वाद टेपवर मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावरून झाला होता. यामध्ये या तरुणाने शेजारी राहणाऱ्या चार जणांना चावा घेतला आहे. हि घटना रविवारी सायंकाळी साजापूर याठिकाणी घडली आहे. पीडित व्यक्तीने या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वाळूज पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
फिर्यादीचे नाव प्रमोद विश्वनाथ इच्छे आहे. तो साजापूर याठिकाणी राहतो.फिर्यादीने शनिवारी आपल्या घरातील टेपवर मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावेळी प्रमोद यांच्या शेजारी राहणाऱ्या शेख अन्वर याने फिर्यादीला रविवारी सायंकाळी ‘तू शनिवारी मोठ्या आवाजात गाणी का लावली होती?’ असा जाब विचारला आणि शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीने आरोपी शेख अन्वरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने हा वाद वाढून त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. यावेळी रागाच्या भरात संतापलेल्या अन्वरने प्रमोदाला मारहाण करायला सुरूवात केली आणि डाव्या करंगळीला चावा घेतला.

आपल्या नवऱ्याला होणारी मारहाण पाहून प्रमोद याची पत्नी कोमल भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली. यानंतर अन्वरची पत्नी आणि त्यांचा मुलगाही या भांडणात सहभाग घेत इच्छे दाम्पत्याला जोरदार मारहाण केली. या भांडणांमध्ये कोमल खाली पडल्या असताना अन्वरने तिच्या मांडीला चावा घेतला. हि हाणामारी पाहून शेजारी नवनाथ कीर्तीकर आणि त्यांची पत्नी सीमा कीर्तीकर हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले.

यावेळी आरोपी अन्वरने भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या नवनाथ यांच्या पाठीला तसेच सीमा यांच्या उजव्या भुवईला चावा घेतला. या मारहाणीनंतर आरोपी अन्वरने फिर्यादी प्रमोद यांच्या अ‍ॅपेरिक्षावर वीट फेकून मारली त्यामध्ये रिक्षाची काच फुटली. या घटनेनंतर प्रमोद विश्वनाथ इच्छे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अजून कोणालाच अटक करण्यात आली नाही.

Leave a Comment