शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या ईदगाहमध्ये शुकशुकाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन रोजे ठेवल्यानंतर आज घरोघरी ईद-उल-फित्र साजरी केली जात आहे. लॉकडाऊन मधील सर्व धार्मिक स्थळे बंद असून सर्वात सणासाठी नियम अटी लावण्यात आले आहेत. त्यामुळे आज सर्वजण लॉकडाऊनचे पालन करून घरीच ईद साजरी करत आहेत. प्रशासनाच्या वतीने कडक असे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच मौलवींनी सुध्दा ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुस्लिम बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

छावणी ईदगाह ही ऐतिहासिक आणि मराठवाड्यातील सर्वात मोठी असून मलिकअंबर याने या ईदगाहची निर्मिती केली. या ईदगाहच्या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण केले जाते. मात्र करण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा या ईदगाहच्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला. आणि सर्वांनी घरी राहून नमाज पठण केले. या ईदहाच्या सर्व बाजूने पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आप्तस्वकीय मित्रपरिवारास सलग दुसऱ्या वर्षीही घरी राहून शीरखुर्माचा आस्वाद घेण्यासाठी बोलवन्यास अडचण येत आहे. त्यासाठी सर्वांनी फोन सोशल मीडियाच्या माध्यमातून कालपासून एकमेकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती. आज सर्व मुस्लिम बांधव घरी राहून प्रशासनाने घालून दिलेले नियमांची अंमलबजावणी करून ईद साजरी करत आहेत.

https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/277829600739881

दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोकांची गर्दी ईदगाहला नमाज पठण करण्यासाठी होते मात्र यंदा प्रशासनाचे घालून दिलेल्या नियमाचे पालन करत आम्ही नामाज पठण केले आणि ईद साजरी करत आहोत.
एम. ए. अजर
( ईदगाह कमिटी सचिव)

Leave a Comment