जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; औरंगाबाद खंडपीठाकडून हिरवा झेंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जळगाव महानगरपालिकेची निवडणूक आॅनलाईन पध्दतीने घेण्यास औरंगाबाद खंडपीठाने हिरवा कंदील दाखवला असून, त्यामुळे जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंर्भात महापौर-उपमहापौरपदासाठी प्रत्यक्ष निवडणुकीसाठी भाजपने नगरसेवकांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेदरम्यान प्रत्यक्ष मतदान निवडीची भाजप नगरसेवकांची याचिका खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे आॅनलाइन पद्धतीचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात भाजप नगरसेवकांची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर जळगाव महापालिकेच्या निवडणुकीस हिरवी झेंडी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment