औरंगाबाद : शहरात 9 आणि ग्रामीण मध्ये 19 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9,तर ग्रामीण भागातील 19 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 110 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 26 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 3 आणि ग्रामीण मधील 23 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील विवेकानंद नगर 1,आदर्श कॉलनी, ठाकरे नगर 2 अन्य 6 रुग्ण आढळले आहे.

ग्रामीण भागातील सोयगाव 1,गंगापूर 2, कन्नड 7, वैजापूर 7,पैठण 2 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर वैजापूर येथील 38 वर्षीय पुरुषाचा आणि 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment