औरंगाबाद : शहरात 6 आणि ग्रामीण मध्ये 30 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 36 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 6,तर ग्रामीण भागातील 30 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 177 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 17 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 3 आणि ग्रामीण मधील 14 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसर 1,वेदांतनगर 1, घाटी परिसर 2 रुग्ण आणि इतर ठिकाणी 2रुग्ण आढळून आले आहे.

ग्रामीण भागातील औरंगाबाद कन्नड 3,वैजापूर 14,गंगापूर 4, पैठण 6 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर गंगापूर येथील 25 वर्षीय एका महिलेचा आणि 61 वर्षीय महिलेचा वैजापूर येथे मृत्यू झाला आहे.

Leave a Comment