औरंगाबाद प्रतिनिधी । सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर बुधवारपासून औरंगाबाद महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली. पहिल्याच दिवशी रस्त्यावर थुंकणाऱ्याला प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारण्यात आला. दंडात्मक कारवाई गुरुवारपासून आणखी व्यापक करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्हा प्रशासन कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. कोरणा पसरवण्याचा अनेक कारणांमध्ये थुंकणे हे एक प्रमुख कारण आहे शहरातील प्रमुख रस्ते सार्वजनिक ठिकाणांवर सर्वसामान्य नागरिक राजरोसपणे पान गुटखा खाऊन थुंकतात. एखाद्या व्यक्तीला साथीचे आजार असेल तर पसरण्याची शक्यता असते. याचीच खबरदारी घेत मनपाने नागरी मित्र पथकाच्या मदतीने व्यापक कारवाई सुरू केली.
दरम्यान, दिवसभरात 51 पेक्षा अधिक नागरिकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक बाजारपेठ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा