Monday, February 6, 2023

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव तालुक्यातील गौरगाव येथे एका वीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अनेकदा फूस लावून पळवून नेत बलात्कार केल्याची फिर्याद विवाहितेने तासगाव पोलिसात दिली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसात सागर भोरे याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहिता गौरगाव येथे पतीसह राहते. शेजारी सागर भोरे हा राहत असल्याने त्यांची चांगली ओळख झाली होती. यातून तो अनेकदा तिच्याशी लगट करायचा. तू मला आवडतेस. मी तुला सुखात ठेवीन व तुझ्यासाठी बायकोला सोडचिठी देईन असे सांगायचा. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी सागरने विवाहितेस फूस लावून पळवून नेत मिरज येथे एका रानात मित्रांसह बलात्कार केला.

यानंतर दोघांचा जबाब घेत विवाहितेस महिला सुधारगृहात ठेवले. तिथेही तो येऊन भेटायचा. सहा महिन्यांपूर्वी त्याने मित्रांसह येत विवाहितेवर बलात्कार करत मित्रांनी त्याचे व्हिडीओ शूटिंग केले. कुठे बोललीस तर समाजात बदनामी करेन असे त्याने सांगितले. यानंतर वारंवार व्हिडिओच्या भीती दाखवून बलात्कार करायचा. याप्रकरणी तासगाव पोलिसात सागर भोरे याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील  ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा