कोरोनाचे नियम मोडणाऱ्या महाभागांकडून मनपाने केला 60 हजाराचा दंड वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून मनपाने ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे या साठी देखील सदर दंड आकारण्यात आला आहे.

घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख जाधव यांच्या नेतृत्वात पथक कर्मचाऱ्यांनी दि 8 मार्च रोजी रस्त्यावर थुंकणे यासाठी एकूण 46 नागरिकांकडून प्रतिव्यक्ती 100 रुपये प्रमाणे 4600 रूपये दंड वसूल केला. तसेच विना मास्क फिरणाऱ्या एकूण 70 व्यक्तींकडून 500 रुपये दंड प्रमाणे 35000 रुपये व रस्त्यावर कचरा टाकणे बद्दल एकूण 2 व्यक्तीकडून 150 रु दंड प्रमाणे 300 रु दंड वसूल करण्यात आला.

विविध ठिकाणी जास्त कचरा आढळून आल्या बद्दल 600 रु दंड वसूल करण्यात आला. बालाजी गृह उद्योग , एमआयडीसी चिकलठाणा यांनी रस्त्यावर कचरा टाकला याबाबत त्यांचे कडून 5000 रु दंड वसूल करण्यात आला.संतोष कासारे ,मोंढा यांचे कडे प्रतिबंधीत प्लॅस्टिक आढळुन आल्या बद्दल 5000 रु दंड वसूल करण्यात आला.डॉ ए के सिद्दीकी ,लाइफ लाईन हॉस्पिटल ,राम मंदिर ,झोन न. 3 यांच्याकडे बायोवेस्ट मटेरियल आढळून आल्या बद्दल 5000 रु दंड वसूल करण्यात आला.असे एकूण मिळून 58500 रु दंड वसूल करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment