औरंगाबाद प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या मारहाणीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्वप्नील सोनवणे, अभिजित राऊत व अन्य एक विद्यार्थी असे तीनजण जखमी झाले आहेत.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपापसात वाद झाला. याबद्दल महाविद्यालयात असताना एका विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या बाहेरील मित्र व नातेवाइकांना कळविले. त्यामुळे एका पक्षाचे काही कार्यकर्ते मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास महाविद्यालयात आले व त्यांनी स्वप्नील सोनवणे, अभिजित राऊत आणि अन्य एका विद्यार्थ्यास रॉड, काठीने मारहाण केली.
हा प्रकार महाविद्यालयाच्या प्रांगणात घडल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांकडून आज दुपारीपर्यंत तक्रार प्राप्त झालेली नाही.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
सांगलीच्या जिल्हा कारागृहात कैद्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
खुशखबर ! 15 फेब्रुवारीपर्यंत 3 कोटी शेतकर्यांच्या खात्यात 2000 रुपये पोहचणार, आपले नाव असे चेक करा