हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगात कधी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका व्यक्तीचा बॅनर सध्या जोरदार चर्चेत आहे. या तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे.
रमेश पाटील नावाच्या ३५ वर्षे व्यक्तीने औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात एक बॅनर लावला आहे. ज्यावर, मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे आहे, असा बॅनर पाटील यांनी लावलं आहे. त्यांच्या या बॅनरची शहरात चर्चा असून, सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो व्हायरल होत आहे.
आपल्या या बॅनरवर त्यांनी पुढे म्हटलं, वय वर्ष 25 ते 40, अविवाहित / विधवा / घटस्फोटीत चालेल. फक्त 2 अपत्य (मुले) पेक्षा जास्त असणारी चालणार नाही असं लिहून रमेश पाटील यांनी आपला संपर्क क्रमांक दिला आहे. याच बॅनरवर रमेश पाटील यांचा मोठा फोटोही लावण्यात आलेला आहे.