चंदीगड, हैद्राबाद ला मागे टाकत देशात औरंगाबाद 11व्या स्थानी

औरंगाबाद – स्मार्ट सिटीज मिशनने सोमवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. चॅलेंज जिंकून औरंगाबादने नवी दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, सुरत, जयपूर, भोपाळ, नाशिक आणि ठाणे या मोठ्या शहरांना मागे टाकले आहे. या विजयासाठी औरंगाबाद शहराला 50 लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

रस्त्यांवर चालणे सर्वांसाठी अनुकूल, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्मार्ट सिटीज मिशनद्वारे स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज सुरू करण्यात आले होते. समाजातील सर्व घटकांसाठी चालणे आणि सार्वजनिक ठिकाणे सुंदर बनवणे ही संकल्पना यात आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून, औरंगाबाद स्मार्ट सिटीने पार्किंग शिस्त सुनिश्चित करण्यासाठी, चालण्याचा अनुभव सुधारण्यासाठी, पादचाऱ्यांची सुरक्षितता सुधारण्यासाठी, सौंदर्य वाढवण्यासाठी, जागा निर्माण करण्यासाठी, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि अभ्यागतांच्या अनुभवाला सुधारण्यासाठी क्रांती चौक आणि कॅनॉटचा परिसर वर पायलट प्रकल्प राबवले.

औरंगाबाद स्मार्ट सिटीने 4 रस्त्यांच्या कायापालटासाठी डिझाइन केले आहे. क्रांती चौक ते गोपाळ टी, पैठण गेट ते गुलमंडी, कॅनॉट आणि प्रियदर्शनी एमजीएम स्ट्रीट. औरंगाबाद महानगरपालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करत असलेले हॉकर्स झोन धोरण आणि पार्किंग धोरण लक्षात घेऊन हे परिवर्तन केले जाणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीचे अतिरिक्त सीईओ अरुण शिंदे आणि डेप्युटी सीईओ पुष्कल शिवम यांनी या चॅलेंज अंमलबजावणी करण्यासाठी टीमचे पर्यवेक्षण केले आहे. सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, मीडिया विश्लेषक अर्पिता शरद, प्रोजेक्ट असोसिएट किरण आढे आणि इंटर्नच्या टीमने प्रकल्पावर काम केले.