औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरणाला नवे वळण; ग्राहकांना तरुणींची छायाचित्रे पाठविणारा अटकेत

0
82
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । बीड बायपास परिसरातील राजेशनगर येथे घडलेल्या औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या मॉलप्रमुख आणि सहायक व्यवस्थापकांना मोबाईलवर तरुणींची छायाचित्रे पाठविणाऱ्या दलालास अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. मनोज गोविंदराव जाधव, (४०, रा. दहीहंडे गल्ली, चिकलठाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या अजून मुळापर्यंत जाण्यास पोलिसांना यश मिळणार आहे.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ७ डिसेंबर रोजी राजेशनगर आणि यशवंतनगर येथील वेगवेगळ्या कुंटणखान्यावर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत रॅकेटचा स्थानिक प्रमुख संजय त्र्यंबक कापसे, आंटी तर दुसऱ्या अड्ड्यावरून विनोद नागवणे आणि अन्य आंटीला अटक केली होती. शिवाय मॉलप्रमुख महंमद अर्शदसह चार ग्राहकांना पकडले होते. तर दोन संशयित आरोपी पोलिसांना पाहून पळून गेले होते. पोलीस तपासात पळून गेलेल्यांपैकी मनोज जाधव आणि अन्य एका एजंटाचा समावेश असल्याचे दिसून आले.त्यानंतर यांचा कसून तपास चालू होता.

गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने आरोपी मनोज जाधवला काल रात्री चिकलठाणा भागातून उचलले. यावेळी आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी आरोपीची पोलीस कोठडी मागितली. पोलिसांची विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपी मनोज जाधवला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here