औरंगाबादमध्ये दुचाकी आणि बसचा भीषण अपघात; एक ठार एक जखमी;

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । औरंगाबादमध्ये दुचाकी आणि बसचा भीषण अपघात मिळत आहे. एका दुचाकीला पाठीमागून बस धडकल्याने झालेल्याअपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शहरातील सिडको बस स्थानका जवळ घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन्ही तरुण (एम.एच.20 व्ही.4412) या दुचाकीवरून जात होते. दरम्यान, जालना जाणारी बस क्रमांक (एम.एच.20 बीएल2907) याबससमोर आले व बस दुचाकीला पाठीमागून धडकली .हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही तरुणासह दुचाकी अर्धी बसमध्ये घुसली होती.

या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी आहे.अपघाताची माहिती होताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी दाखल होत अडकलेल्या तरुणांना बस मधून काढले व दोघांना रुग्णालयात हलविले दुपार पर्यन्त दोन्ही तरुणाची ओळख पटली नव्हती. प्रथमदर्शनी दोघेही परळी येथील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलीस तरुणाची ओळख पाठविण्याचे काम करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment