औरंगाबाद – कोरोना काळात रोजगाराची हमी दिल्यामुळे राज्यात औरंगाबाद जिल्ह्याने नंबर वन बाजी मारण्याचा बहुमान मिळविला आहे. सोलापूर दुसऱ्या क्रमांकावर असून नाशिक सर्वात मागे पडले आहे.
रोहयो अभियानात मनुष्यदिवस निर्मिती म्हणजेच जास्त दिवस काम उपलब्ध करुन देण्यात जिल्ह्याने 252 टक्के उद्दिष्ट साध्य केले. द्वितीय क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात 187 टक्के, तर मराठवाड्यातील लातूरने 158 तर नांदेड 149 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली व्यवसाय बंद झाले. या काळात रोहयोने मदतीचा हात देत रोजगार दिला.
शासनाने उद्दिष्टांत मागे असलेल्या जिल्ह्यातील तालुक्यातील गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. भंडारा, नंदुरबार, धुळे, रत्नागिरी आणि नाशिक हे जिल्हे सर्वात मागे आहेत.