महिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, तो क्षण पाहून संपूर्ण वसाहतीतील डोळे पाणावले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । त्या महिलापोलिस कर्मचारिस जेंव्हा वैधकीय पथक रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस वसाहतीत आले तो क्षण वसाहतीतील सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणाराच होता. पोलीस उपायुक्त मीना मकवणा यांनी स्वतः अर्धातास उन्हात उभे राहत धीर देत त्या महिला कर्मचारिस रुग्णालयात रवाना केले. त्यावेळी उपयुक्तांचा देखील उर भरून आला होता. यामुळे वरून कणखर, रागीट, कठीण वाटणारा पोलीसांचा हृदय आतून किती हावळा असतो याचे प्रत्यय आले.

शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयातिल पोलिस वसाहतीत राहणाऱ्या व क्रांतिचौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 32 वर्षीय महिला पोलीस कर्मचऱ्याचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निदान झाले. मात्र याची कल्पना वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना न्हवती. सकाळी साडे अकराच्या सुमारास पोलीस उपायुक्त मीना मकवणा या वसाहतीतील एका बिल्डिंग समोर आल्या आणि कर्मचऱ्याना सूचना करीत बराच वेळ निरीक्षण करीत होत्या. दरम्यान औषधी फवारणी व इतर सोपस्काराला सुरुवात झाली. परिसरात कुणाला तरी कोरोनाची बाधा झाली याची कुणकुण सुरू झाली आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच दरम्यान वैधकीय पथक देखील दाखल झाले आणि आता मात्र रहिवाशांच्या मनात निश्चित झाले होते की आपल्या वसाहतीत कोरोना बाधित रुग्ण आहे. आणि काही वेळात दुजोरा देखील मिळाला.

दुपारची दीड वाजायची वेळ बाहेर कडक ऊन कडक उन्हात 108 रुग्णवाहिका बिल्डिंग समोर येऊन उभी राहिली. वसाहतीत राहणारे शेकडो कुटुंबातील हजारो लोक आपापल्या घरातील खिडकी मधून त्या रुग्णवाहिकेतून बाहेर पडणाऱ्या वैधकीय पथकाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. दरम्यान उपयुक्त मकवणा या त्या महिला कर्मचारि खाली येण्याची वाट पाहत होत्या. काही वेळातच कोरोनाचे निदान झालेली 32 वर्षीय महिला कर्मचारी आपले कपडे व इतर साहित्याची बॅग घेऊन पती, एक चिमुकली, सह खाली आली. 5 ते 6 वर्ष वय असलेली चिमुकली आपल्या योध्या आईच्या कुशीत खेळायची तिला सवय होती. मात्र काल पासून आई का जवळ घेत नाही? बाबा मला आई जवळ का जाऊ देत नाही? आणि कपडे व सर्व सामानाची बॅग घेऊन आई कुठे निघाली? डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखा पर्यंत विचित्र कपडे परिधान केलेली ही माणसे आहेत तरी कोण? असे अनेक प्रश्न त्या चिमुकलीच्या मनात होते. बाहेर येताच खिडकी मधून डोकावणाऱ्या हजारो नजरा आपल्या आई कडे असे काय पाहत आहेत. हे सर्व पाहून त्या चिमुकलीला रडू कोसळले ती जोर-जोरात हंबरडा फोडायला लागली. त्यावेळी रणांगणात अट्टल गुन्हेगारांना घाम फोडणारी रणरागिणी मात्र रस्त्यावर एकटी दूर उभे राहत जणू असहाय्य झाल्यासारखी आपल्या पोटच्या गोळ्याकडे बघत होती.

मला शिंका जरी अली तरी आई दिवसरात्र एक करीत असे मात्र मी इतके रडत आहे तरी देखील आई मला कडेवर घेत नाही हे पाहून ती चिमुकली बाबांच्या अनेक आलिंगणानंतर ही काही करे गप्प बसेना. एकी कडे किंचाळून रडणारी निरागस चिमुकली तर त्यासमोर उभी असलेली असह्यय आई. हे दृश्य पाहून साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. पोलीस उपायुक्त मकवणा यांनी त्या कर्मचऱ्यास धीर दिला. घाबरून जाऊ नका आम्ही सर्व तुमच्या सोबतीला आहोत. तापत्या उन्हात उपयुक्त मकवणा यांनी कोरोना बाधित महिला यांची आपल्या घरातील सदस्य सारखी आपुलकीने विचारपूस करीत धीर दिला.त्या नंतर रुग्णवाहिका सुरू झाली आणि नागरिकांसाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावत कोरोनाची लागण झालेली ती महिला कर्मचारी रुग्णवाहिकेतून गेली. हे दृश्य एवढे भावनिक होते की पोलीस उपायुक्त मीना मकवणा सह वसाहतीत राहणाऱ्या लहान पासून मोठ्या पर्यंत सर्वांचेच डोळे पाणावले होते. यामुळे वरून टणक, रागीट वाटणाऱ्या पोलिसांचे हृदय आतून किती हळवे असते सर्वांनी पाहिले…

Leave a Comment