महिलांच्या मनातील भयमुक्त वातावरणासाठी निर्णय घ्या! औरंगाबादमधील तरुणाईचे पंतप्रधानांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सर्व स्तरातून समोर येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे. अशा मागणीचे पत्र विद्यार्थ्यांनी थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.

स्वातंत्र्य मिळून आता ७३ वर्ष झाले असून आपण विविध क्षेत्रात आमुलाग्र प्रगती केली आहे. मात्र, आजही देशात महिलांसाठी आपण सुरक्षित वातावरण निर्माण करू शकलो नाही. हैद्राबाद येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर जनतेच्या मनात तीव्र राग आहे. प्रत्येकजण तुम्ही यावर काय बोलणार याची वाट पाहत आहे. आपण तरुणांना उद्याचे भविष्य असे म्हटले आहे. हिच तरुणाई आपल्याला विनंती करत आहे की, अशा गुन्ह्यात कडक कायद्याची अंमलबजावणी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. आम्ही आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत.

समाजातील पितृसत्ताक मानसिकता संपुष्टात आणली तरच अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांना आळ बसेल. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा तरच त्या सुरक्षित राहतील. हैदराबाद प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी. न्यायालयाने त्या नराधमांना कठोर शिक्षा करावी. जेणे करून अशा हिंसक कृत्यांना आळा बसेल. अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात.

WhatsApp Image 2019-12-04 at 6.44.57 PM.jpeg

Leave a Comment