औरंगाबादकरांनो सावधान ! हवेची गुणवत्ता जातेय धोक्याकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात वाढणारे सिमेंटचे जंगल, औद्योगिकीकरण, वाहनांमधून पडणाऱ्या विषारी धुरामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता आता धोक्याच्या पातळीकडे हळूहळू वाढू लागली आहे. यासंदर्भात वेळीच उपाययोजना न केल्यास औरंगाबादची हवा दिल्लीसारखी होण्यास फार वेळ लागणार नाही.

किती आहे शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स –
शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 100 पर्यंत असेल तर हवा शुद्ध आहे, असे म्हणायला हरकत नाही. शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मंगळवारी 101 होता. त्यामुळे आपण हळूहळू धोक्याच्या पातळीकडे सरकतोय, हे विशेष.

कारणे काय?
बेसुमार वृक्षांची कत्तल करून तेथे टोलेजंग इमारती बांधण्याचा सपाटा सुरू आहे. शहराच्या आसपासची शेती आता प्लॉटिंगमध्ये बदलत आहे. नवीन वृक्षांची लागवड फार कमी होते. औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वाहनांची संख्याही अफाट झाली. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे.

Leave a Comment