वाढत्या उकाड्यात औरंगाबादकरांनी ‘ईतक्या’ कोटींच्या आईस्क्रीमवर मारला ‘ताव’ 

 

औरंगाबाद – असे म्हणता न “थंड रहा, आईस्क्रीम खा” सध्या बाजारात फिरल्यावर असेच काहीसे वाटत आहे. उन्हाळ्यातील सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक सध्या थंड पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. या थंड पदार्था मध्ये या वेळेस आईस्क्रीमचा खप जास्त प्रमाणात वाढलेला दिसत आहे.

त्यात औरंगाबादकरांनी मागील 3 महिन्यात 40 कोटींच्या आईस्क्रीम वर ताव मारला आहे. उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याची मज्जाच वेगळी असते तसेच कोरोनाकाळात नागरिकांना आईस्क्रीम खाताच आले नाही. त्यामुळे यावेळी नागरिक विविध प्रकारच्या फ्लेवर्सच्या आईस्क्रीमचा मनोसोक्त आस्वाद घेताना दिसत आहेत.

सध्या बाजारात 180 प्रकारचे आईस्क्रीम फ्लेवरस आले आहेत, त्यामध्ये 10 ते 12 फ्लेवर्स आपल्याला माहित आहे. पण आता 180 पेक्षा ही जास्त फ्लेवर्स उपलब्ध आहे, त्यामध्ये केशर क्रीम बॉल, क्रीम अँड कुकीज, मसालेदार पेरू, व्हाईट चॉकलेट, मसाला पान, ड्रायफ्रूट मलाई, सिताफळ, शहाळे नारळ आईस्क्रीम, अमेरिकेन नट्स या विविध व नावीन्यपूर्ण आईस्क्रीम फ्लेवर्सचा यात समावेश झाला आहे. तसेच 5 रुपयांच्या कुल्फीपासून 900 रुपयांच्या क्रीम बोल आईस क्रीम आता बाजारात उपलब्ध आहेत. आईस्क्रीम पार्लर मध्ये तसेच घरी सुद्धा नागरिक फॅमिली पॅक खरेदी करत आहे. तसेच लग्न, बर्थडे पार्टी, अश्या विविध कार्यक्रमामध्ये देखील आईस्क्रीम चा खप होत आहे.

त्यासोबतच सध्या जास्त प्रमाणात नागरिकांची पसंती असलेला थंड पदार्थ म्हणजेच “फालुदा” आहे, याचा देखील भरपूर प्रमाणात विक्री होत आहे त्यामुळे “आईस्क्रीम फालुदा” हा ट्रँडिंग मध्ये चालू आहे.