औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरातील सुमारे पंचवीस हजार व्यवसायिक मालमत्ता त्याच्या नळांना मीटर बसविण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासन तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सीईओ अस्तिककुमार पांडेय यांनी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यात केली जाईल, असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले. राज्य शासनाने शहरासाठी सोळाशे 80 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे.
ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील निवासी नळांना मीटर लावण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच व्यवसायिक नळांना मीटर लावण्याचा निर्णय पांडेय यांनी घेतला होता. यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले सध्या शहरात दररोज 125 एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी पुरवठा मध्ये सुधारणा केली जाईल. दरम्यान 25 हजार व्यवसायिक नळ असल्याची महापालिकेकडे नोंद केली आहे. या नळांना मीटर बसविण्याची प्रक्रिया येत्या दोन महिन्यात राबविण्यात येईल, असे पांडेय यांनी सांगितले.
शहरातील अनेकांनी निवासी मालमत्ता म्हणून न घेतलेले आहेत. पण वापर मात्र व्यवसायिक सुरू आहे. त्यांना पाणीपट्टी आकारण्यात येण्यास अडचणी येत आहे. व्यवसायिक मालमत्तांना देण्यात आलेले नळ कनेक्शन शोधण्यात आले असून त्याकरिता वॉटर मीटर बसविण्याची प्रक्रिया दोन महिन्यात सुरू केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून वॉटर मीटरची खरेदी करण्यात येणार आहे असे श्री पांडेय यांनी नमूद केले.