बॉलिवूडला औरंगाबादचे आकर्षण; जिल्ह्यात होणार अनेक वेबसिरीजचे चित्रीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद| महानगरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच शूटिंगला वेळेची येणारी बंधन यामुळे हिंदी, मराठी चित्रपट व वेबसिरीजच्या मोठमोठ्या बॅनरला ‘औरंगाबाद शहरा’चे आकर्षण दाले आहे. वर्षभरात पाच चित्रपट व दोन वेबसिरीजचे चित्रीकरण जिल्ह्यात झाले. शिवाय येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये एक हिंदी व दोन मराठी चित्रपटांसह काही मोठ्या वेबसिरीजचे २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण जिल्ह्याच्या विविध ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे तसेच त्यात भर घालणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हिंदी, मराठी चित्रपटासह वेबसिरीजचे प्रोडक्शन हाऊस येथे शूटिंगसाठी सेट लावत आहेत. शहरात नुकतेच ज्येष्ठ अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या काही दृश्‍यांचे चित्रीकरण झाले. यात केवळ दहा तासांसाठी तीस लाखांचा खर्च आला. यातून स्थानिकांनाही रोजगार मिळाला. भविष्यात असे अनेक चित्रपटांचे जिल्ह्यात चित्रीकरण होणार असल्याचे एट अवर्सचे संचालक किशोर निकम यांनी सांगितले. यासाठी औद्योगिक, सामाजिक संस्था, स्थानिक कलावंत, शासकीय अधिकारी, नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

एखाद्या चित्रपटाचे शूटिंगचे काम पूर्ण तसेच चित्रपट रिलीज होईपर्यंत चित्रपटासंदर्भातील माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येते. परंतु, शूटिंगसाठी आलेले अभिनेत्यांचे फोटो स्थानिक नागरिक काढून फेसबुक व इतर समाजमाध्यमांवर शेअर करतात. त्यांच्या या फोटोच्या दहा लाइकमुळे चित्रपटाच्या शूटिंगची माहिती सर्वत्र पसरते आणि चित्रपट रिलीज होण्याआधीच चर्चेत येतो. यामुळे चित्रपट प्रोडक्शन हाऊसला याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे स्थानिक नागरिक व कलावंतांनी चित्रपट शूटिंगचे चित्रफीत व फोटो काढणे टाळावेत.

चित्रीकरणाची ठिकाणे राज्याची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. यात जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद किल्ला, दौलताबादचा घाट, खुलताबाद, चारोळा तसेच शहरातील जुने वाडे, मंदिर, मशीद, चर्च, जुने शासकीय कार्यालयाच्या इमारती अशा ठिकाणी आतापर्यंत डझनभराहून अधिक चित्रपटांचे शूटिंग झाले. भविष्यातही होणार आहे. यापूर्वी झाले शूटिंग बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांचा ‘पाकिजा’, ‘बुरा आदमी’- प्राण, ‘लाडला’ चित्रपटाची शूटिंग व्हिडिओकॉन कंपनीत झाली होती. ‘एम. एस. धोनी दी अनटोल्ड स्टोरी’साठी सुशांतसिंह राजपूत यांची शूटिंग औरंगाबाद लेणी तर चाईना देशातील चाईनीच चित्रपटाची अजिंठा, वेरूळ लेणीला १५ दिवस शूटिंग झाली. वर्षभरात ‘जून’ हा मराठी चित्रपट औरंगाबाद लेणी, ‘रे’ या वेबसिरीजचे शूटिंग हे वेरूळ लेणी, छावणीचे चर्च, स्मशानभूमी येथे करण्यात आली; तसेच शहराच्या विविध ठिकाणी विविध वस्तू, बॅंकांच्या जाहिरातीचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

Leave a Comment