औसा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचा जुना खेळाडू राजकारण फिरवणार??

Ausa assembly
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस – शिवसेना – भाजप अशा पक्षातील अनेक प्रस्थापित नेत्यांची आमदारकीची स्वप्न आधी अधुरी असताना… अचानकच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्वीय सहाय्यक औसा मतदारसंघात ऍक्टिव्ह होतो… गाठीभेटी, जनसंपर्क वाढवतो… आणि अखेर पिए टू एमएलए असा भला मोठा राजकीय प्रवास पूर्ण करतो… मी बोलतोय देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू, माजी स्वीय सहाय्यक आणि औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याबद्दल… या मतदारसंघानं राजकारणातील खेकडे प्रवृत्ती बघितलीय… जातीचं धारदार राजकारण बघितलय.. आणि कधीही मार्गी न लागलेले मतदारसंघातील जीवन मरणाचे प्रश्नही… मुख्यमंत्र्यांच्या जास्त कनेक्ट मध्ये राहिल्यामुळे अभिमन्यू पवारांनी मोठ्या प्रमाणावर निधी तालुक्यात आणला, याबाबत नो डाऊट… पण हाच अभिमन्यू शिवसेना फुटीनंतर चक्रव्ह्युवात सापडलाय… ग्राउंडला केलेल्या रिसर्चनुसार औसा विधानसभेत यंदा कोण आमदार होतोय? मतदारसंघाच्या इतिहासापासून ते आमदारांच्या रिपोर्ट कार्ड पर्यंत सगळं काही तपशिलात पाहुयात

वारकरी संप्रदायाची पताका अविरत फडकवत ठेवणाऱ्या नाथपीठाचा वारसा लाभलेला औसा विधानसभा मतदारसंघ… काँग्रेसचा विचार नसानसात पेरलेला असताना इथं शिवसेनेची एन्ट्री झाली… आणि औसा मतदारसंघ गांधीवादी विचारांकडून हिंदुत्ववादी विचारांकडे शिफ्ट झाला… कास्ट पॉलिटिक्सला इथं फार महत्व दिलं जाऊ लागलं… आणि यातूनच शिवसेनेचे दिनकर माने यांनी सलग दोन टर्म औसा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं… विलासराव देशमुख-शिवराज पाटील चाकूरकर या दोन काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत संघर्षामुळेच इथं शिवसेनेचे माने विजयी झाले होते… पण 2009 मध्ये बसवराज पाटील यांनी त्यांचा पराभव केला… 2014 मध्ये युती तुटल्यानंतर याठिकाणी भाजपने शेतकरी नेते पाशा पटेल यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांचा निभाव लागू शकला नाही…. शिवसेनेचे माने दुसऱ्या क्रमांकावर राहिले… आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा विजय सोप्पा झाला… बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते… औसा मतदारसंघात लिंगायत मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्यांना इथं उमेदवारी देण्यात आली होती. लिंगायत मतांच्या बळावरच पाटील यांनी 2009 आणि 2014 असं सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता….

पण 2014 ला भाजपला थोड्याफार का प्रमाणात मिळालेल्या मतांचा रिस्पॉन्स पाहता इथं थोडासा जोर लावला तर आमदार निवडून आणायला स्कोप आहे, असा विचार कदाचित भाजप नेतृत्वाच्या मनात आला असावा… त्यात 2014 लाच राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आल्याने औश्यात भाजपला कशी एन्ट्री मिळेल? यासाठी स्वतः फडणवीसांनी डावपेच टाकायला सुरुवात केली… त्यातच त्यांना उत्तर सापडलं आणि ते म्हणजे अभिमन्यू पवार… फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अभिमन्यू पवार त्यांचे स्वीय सहायक म्हणजेच पीए होते… पवारांची राजकीय आणि सामाजिक जडणघडण संघाच्या शाखेतच झाल्यामुळे आणि कुठलही काम चोख पार पाडण्याच्या अभिमन्यू पवारांच्या स्वभावामुळे त्यांच्यावरचा फडणवीसांचा विश्वास कणकणाने वाढत गेला… भविष्यातील व्हिजन डोळ्यांसमोर ठेवून पवार यांना दोन ते तीन वर्षांपासून औशात ऍक्टिव्ह ठेवलं… मतदारसंघातील अनेक विकास कामं पवारांनी मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट असल्याने तडीस लावली… मिनिटा मिनिटाला माणूस जोडत औसामध्ये तगडा जनसंपर्क तयार केला… आणि जेव्हा 2019 ची शिवसेना-भाजप युतीची जागा वाटपाची चर्चा सुरू झाली… तेव्हा फडणवीसांनी अगदी हुशारीनं मेरिटच्या बेसिसवर ही जागा भाजपच्या वाट्याला खेचून आणली… अर्थात उमेदवार होते अभिमन्यू पवार…

काँग्रेसकडून बसवराज पाटील विरुद्ध भाजपच्या अभिमन्यू पवार यांच्यात अटीतटीचा सामना झाला… पण अखेर पवारांनी गुलाल उधळत औसा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकवत ठेवला… यानंतर औसा मतदारसंघात अनेक राजकीय उलथा पालथी झाल्या… माजी आमदार दिनकर माने शिवसेनेच्या फुटीत ठाकरेंसोबतच राहिले… तर काँग्रेसचे आमदार बसवराज पाटलांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्यानं यंदा इथे भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट… अभिमन्यू पवार विरुद्ध दिनकर माने… कमळ विरुद्ध मशाल… अशी अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते…

विद्यमान आमदार पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर शेत शिवार रस्त्यांची केलेली कामं, विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात घेतलेला पुढाकार, बंद पडलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू करणं, बाजार समितीवर वर्चस्व अशा अनेक गोष्टी येणाऱ्या विधानसभेला स्टॅंडिंग आमदारांना प्लसमध्ये ठेवणाऱ्या आहेत… त्यात बसवराज पाटील भाजपसोबत आल्यानं लिंगायत समाजाचा मोठा वोट शेअरही भाजपला यंदा मिळू शकतो… फक्त मराठा समाज इथे नेमकी कशी भूमिका घेईल? यावरही इथल्या आमदारकीची बरीचशी समीकरण ठरणार आहेत… अभिमन्यू पवार मराठा असल्यामुळे आणि तालुक्यातील लिंगायत समाजातील मोठं नाव बसवराज पाटील हे भाजपमध्ये आल्याने मराठा प्लस लिंगायत यांची मतदानाला होणारी गोळा बेरीज पाहता अभिमन्यू पवार यांचेच सध्या तरी आमदार होण्याचे चान्सेस जास्त दिसतायेत…

फक्त ठाकरे गटाच्या मशालीमुळे फडणवीसांचे अभिमन्यू चक्रव्ह्यूवात सापडण्याचा धोका जास्त आहे… माजी आमदार दिनकर माने हे ठाकरे गटात आहेत… त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही औसा मतदारसंघातून मशालीला लीड मिळाल्यानं मानेंना पुन्हा एकदा आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत… त्यात ठाकरे गटाकडूनच संतोष सोमवंशी यांचं नावंही उमेदवारीसाठी चर्चेत आहे… पण सध्यातरी सगळ्याच शक्यतांचा विचार केला तरी अभिमन्यू पवार यांचंच नाणं विधानसभेला जोरदार वाजेल… असं राजकीय विश्लेषकांचंही म्हणणं आहे…बाकी औसा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा गुलाल यंदा कुणाला लागतोय? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…