ऍडिलेड । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने पहिल्या डावात चांगल्या प्रदर्शनानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या आहेत.
पहिल्या डावात भारताने ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतल्यानंतर आज तासाभरात भारताचे ५ फलंदाज आल्या पावली तंबूत परतले आहेत . वृत्त लिहीपर्यंत भारताने ३६ धावांवर ९ विकेट गमावल्या असून 89 धावांची आघाडी घेतली आहे. हेजलवूडने सर्वाधिक ५ विकेट घेत पहिल्या सत्रात घेत टीम इंडियाला हादरे दिलेत.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर मयंक अग्रवाल आणि नाईट वॉचमॅन जसप्रीत बुमराह नाबाद होते. मात्र टीम इंडियासाठी तिसऱ्या दिवसाची वाईट सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भाराताची अवस्था अत्यंत बिकट केली. अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडलाच, शिवाय संघाच्या 31 धावांवर भारताचे 9 फलंदाज माघारी परतले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’