AUS vs IND: भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियात काढली इज्जत; कसोटी इतिहासातील कमी धावसंख्येचा लावाला बट्टा

0
65
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एडिलेड | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली. वाईट म्हणजे आजवरची सर्वात निम्मं दर्जाची कामगिरी ठरली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिंन्स आणि जोश हेजलवूड यांच्यापुढे भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एकट्या हेजलवूडने केवळ ८ धावा देत ५ विकेट निम्मा भारतीय संघाला घरी पाठवले.

पहिल्या डावात चांगली आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला आज मोठी धावसंख्या उभी करण्याची संधी होती. पण दुसऱ्या डावात भारताची विकेट एका पाठोपाठ एक पडू लागल्या. भारतीय फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. आणि संपूर्ण भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांवर तंबूत परतला. आणि यासोबतच भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याच्या कुविक्रम विराट कोहली आणि कंपनीने आपल्या नावावर केला. इतिहासात १९७४ साली इंग्लंड विरुद्ध भारताचा ४२ धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९७४ साली भारताचा डाव ५८ धावांवर संपुष्टात आला होता.

भारताने कालच्या १ बाद ९ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल भारताने ऑस्ट्र्लियाला १९१ धावांवर रोखले होते आणि ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने कसोटीवर पकड मिळवली होती.

अन भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे गडगडला
पहिल्या सत्राचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिंन्सने ४ तर जोश हेजलवुडने ५ विकेट घेतल्या आहेत. भारताने १९ धावसंख्येवर ६ विकेट गमावल्या होत्या. याआधी कसोटीत भारताने कधीच इतक्या कमी धावसंख्येवर ६ विकेट गमावल्या नव्हत्या. मयांक अग्रवाल आणि नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह खेळण्यास आले.

बुमराह २ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवाल ९ धावा करून बाद झाला. पहिल्या डावात देखील त्याला धावसंख्या उभा करता आली नाही. मयांक बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १५ अशी होती आणि मैदानावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते.

ही जोडी भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. पम अजिंक्य शून्यावर बाद झाला. त्यानंतर सर्व मदार विराट कोहलीवर होती. पण तो देखील ४ धावा करून माघारी परतला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १९ अशी झाली. दुसऱ्या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताकडून सर्वाधिक ९ धावा मयांक अग्रवालने केल्या. तर हनुमा विहारीने ८ धावा केल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here