क्रिकेटला काळीमा फासणारी घटना ; मॅच सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूंना प्रेक्षकांकडून शिविगाळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. खरं तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतरदेखील चौथ्या दिवशी सिडनीच्या मैदानातील काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केल्याने सुरू असलेला खेळ थांबवण्याची वेळ आली.

https://twitter.com/GauravK_8609/status/1348119175282135043?s=20

सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी काही चाहते त्याच्याबाबत आक्षेपार्ह शब्द बोलले. हे पाहून त्याने सुरूवातीला दुर्लक्ष केलं, पण त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नाही, हे पाहिल्यानंतर त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता.

दरम्यान, तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांचा दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित केला. भारताला विजयासाठी ४०७ धावांची गरज असून टीम इंडियाकडे १४८ षटके आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment