सुप्रीम कोर्ट निकाल । महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणीचे आदेश; गुप्त मतदान नको

दिल्ली प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तापेच सोडविण्यासाठी उद्याच बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. यामुळे फडणवीस सरकार यांची उद्या अग्निपरीक्षाच असेल असे म्हणावे लागेल. या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी … Read more

‘#आम्ही १६२’ ; तिन्ही पक्षातील आमदारांनी घेतली एकनिष्ठेची शपथ

मुंबई प्रतिनिधी । आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे एकूण १६२ आमदार एकत्रित येऊन तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह एकजुटीची शपथ घेतली. ‘आम्ही १६२’ अशी ह्या कार्यक्रमाची टॅगलाईन होती. यामध्ये आपापल्या नेत्यांशी तसेच पक्षाशी एकनिष्ठेची शपथ जमलेल्या सर्व आमदारांनी घेतली. सत्तासमीकरण जुळविन्यासाठी व भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी राज्यातील या तिन्ही दलांनी ‘महाविकासआघाडी’ … Read more

“मेरा साया भी बडा नमक हराम निकला…” आव्हाड यांचे अजित पवारांवर टिकास्त्र

मुंबई प्रतिनिधी । “मेरा साया भी बडा नमक हराम निकला | दिन मे मेरे साथ था… रात मे कहीं ओर से निकला !!!” अशी शायरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीवर सादर करीत त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. ‘महाविकासआघाडी’ची बोलणी अंतिम टप्प्यावर असतांना अचानकपणे एका रात्रीत होत्याच नव्हतं होत भाजप सोबत … Read more

मध्यप्रदेशातही राजकीय भूकंप ?? ज्योतिरादित्य सिंधिया भाजपच्या वाटेवर…?

विशेष प्रतिनिधी । गेल्या महिन्याभरापासुन देशाच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणानंतर आता मध्यप्रदेश मधील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यप्रदेश मधील काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार राजकीय चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चांना पुष्टी म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर केलेल्या बदलाची जोडण्यात येत आहे. त्यामुळेच अनेक … Read more

‘महाविकासआघाडी’च्या सरकार स्थापनेसाठी 164 आमदारांचे राज्यपालांना सह्यांनिशी पत्र

मुंबई प्रतिनिधी । भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरणार असून, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस व मित्रपक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी तातडीने पाचारण करण्यात यावे, अशी मागणी आज महाविकासआघाडी तर्फे राज्यपालांकडे करण्यात आली. महाविकासआघाडीच्या सरकारसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांच्या एकूण १६४ आमदारांचे सह्यांनिशी पत्र राज्यपालांना सादर करण्यात आले. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला राज्यपालांनी बोलवावे अशी या … Read more

अजित पवारांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी? शरद पवार म्हणतात…

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलानी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेटे अजित पवार यांनी बंड करत भाजप सोबत संधान साधल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिम्मित कराड येथील प्रितिसंगम येथे … Read more

खेळाडू आहात…?? मग सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नकाच.

करीअरनामा । सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागात खेळाडूंसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोनने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कर सहाय्यक आणि हवालदार पदांच्या 30 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 10 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी … Read more

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे, लहान बंधू राष्ट्रपती गोताबाय राजपक्षे यांनी दिली शपथ

हॅलो महाराष्ट्र,  प्रतिनिधी । श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे यांनी शपथ घेतली. वयाने लहान असलेले त्यांचे लहान भाऊ गोताबाय राजपक्षे यांनी त्यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली.  ७४  वर्षीय राजपक्षे ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीपर्यंत  काळजीवाहू  पंतप्रधान म्हणून काम पाहतील. लहान बंधू गोताबाय यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतरच  महिंदा यांनी राष्ट्रपती सचिवालयात नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी माजी … Read more

“कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आना ही अच्छा होता है…” संजय राऊत यांचे भावनिक ट्विट

मुंबई प्रतिनिधी ।  राज्यात नवीन सत्ता समीकरणे निश्चित झाल्यामुळे आता भाजप आणि शिवसेना यांच्यातील नाते संबंध हे आता राज्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात असतील. अनेक वर्षे सोबत एकत्र काम केल्यानंतर शिवसेना व भाजप आता अधिकृतपणे वेगळे होणार आहेत. यामुळे साहजिक दोन्ही पक्षातील मैत्रीचं नातं आता हे पूर्वी प्रमाणे नसेल. ज्यां पक्षांशी तीस वर्षे एकत्र संघर्ष केला, आता … Read more

नेमबाजी विश्वचषक फायनल्स; मनु भाकरने सुवर्णपदक जिंकले

हॅलो महाराष्ट्र, प्रतिनिधी । भारताच्या मनु भाकरने पुटियान (चीन) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आज सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) प्रतिष्ठेच्या हंगामात १७ वर्षीय मनू भाकरने २४४. गुणांची नोंद केली. तिचा प्रतिस्पर्धी यशस्विनीसिंग देसवालने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहावे स्थान मिळविले. सर्बियाच्या … Read more