Auto Cleaning Robots | तुमच्या घराला अगदी चकचकीत करेल हे मशीन; किंमतही आहे स्वस्त

Auto Cleaning Robots
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आता बऱ्याच लोकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्या उन्हाळ्यामध्ये आपण नेहमीच बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. किंवा अनेक लोक गावाला जात असतात. परंतु जेव्हा आपण आठवड्याने किंवा महिन्याने पुन्हा आपल्या घरी येतो. तेव्हा आपल्या घराची खूप वाईट अवस्था झालेली असते. सगळीकडे धूळ आणि घाण पसरलेली असतात. आणि ती साफ करायला आपल्याला एक -दोन दिवस लागतात. परंतु आता तुम्हाला या साफसफाईची काळजी करायची काहीच गरज नाही. कारण बाजारात आता असे एक क्लिनिंग रोबोट्स (Auto Cleaning Robots) आले आहेत. जे तुम्ही तुमच्या घरी नसतानाही तुमचे घर स्वच्छ करू शकतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? रोबोट ही एक मशीन आहे आणि आपण घरी नसताना ती आपले घर कसे स्वच्छ करतात? तर आज त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Smart Robot Cleaner Auto Floor Cleaning Sweeping Sweeper

तुम्ही हा रोबोट व्हॅक्युम क्लिनर ॲमेझॉन वरून देखील खरेदी करू शकता. याची किंमत 13479 रुपये आहे. तुमच्या घरात साचलेली धूळ, माती सगळं काही स्वच्छ करेल. या व्यॅक्युम क्लिनरमध्ये तुम्हाला हाय स्पीड मोटर मिळते. जी बाहेरच्या फिरणाऱ्या वायपरच्या मदतीने संपूर्ण घर स्वच्छ करते. यामध्ये तुम्हाला यूएसबी चार्जिंग मोड देखील मिळतो. यासोबत 1500 mah ली आयन बॅटरी क्षमता देखील उपलब्ध आहे. या बॉटलमध्ये आद्रता स्प्रे देखील उपलब्ध आहे, ज्याने स्वच्छता चांगली होती.

ECOVACS DEEBOT_500 Robotic Floor Cleaner

तुम्हाला जर हा व्हॅक्युम क्लिनर फ्लिपकार्टवरून खरेदी करायचा असेल, तरी देखील करू शकता. फ्लिपकार्टवर याची किंमत फक्त 999 रुपये आहे. हा रोबोट आकाराने लहान आहे. त्यामुळे अगदी कमी जागेत देखील तुम्ही वापरू शकता. याने घराची स्वच्छता देखील नीट होते. हे क्लिनर ॲपद्वारे नियंत्रित केले जाते. युजर त्यांच्या अनुपस्थितीत देखील घराची साफसफाई करू शकता.

Intelligent Sweeping Robot, Automatic Robotic Sweeper Machine

हा एक सर्वसामान्य माणसांना परवडणारा रोबोट व्हॅक्युम क्लिनर आहे. ॲमेझॉनवर याची किंमत 6009 रुपये एवढी आहे. ग्राहकांना 1200 mah बॅटरी मिळते आणि सेन्सर्स देखील आहेत. हे आकाराने लहान आहेत त्यामुळे सहजपणे फर्निचर खाली जाते. तसेच कोपऱ्यातील धूळ आणि घाण काढून टाकते.

Myaddiction Robotic Vacuum Cleaner Smart Floor Suction Mopping Cleaning

हा व्हॅक्युम क्लिनर 3152 रुपयांमध्ये आहे ॲमेझॉन वरून देखील तुम्ही हा खरेदी करू शकता. यामध्ये शक्तिशाली बॅटरी देखील उपलब्ध आहे. त्यातून तुम्ही पूर्ण घराची साफसफाई करू शकता. म्हणजे आता तुम्ही घरी नसताना देखील तुमचे घर स्वच्छ राहणार आहे. कारण हे रोबोट तुमच्या घराची स्वच्छता करणार आहेत.