हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी (Auto Expo 2023) कार कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली पहिली ऑफ-रोड SUV मारुती जिमनी सादर केली आहे. मारुतीच्या या एसयूव्हीला 5 दरवाजे आहेत. मारुती सुझुकीची नवी जिमनी एसयूव्ही महिंद्राच्या थारशी स्पर्धा करू शकते. आज आपण जाणून घेऊया या जबरदस्त SUV चे खास फीचर्सबाबत…
फीचर्स –
मारुती जिमनीची लांबी (Auto Expo 2023) 3985 मिमी, रुंदी 1645 मिमी आणि उंची 1720 मिमी आहे. या गाडीला 2590 मिमीचा व्हीलबेस आणि 210 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. या एसयूव्हीमध्ये 4 लोक आरामात बसू शकतात. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एलईडी डीआरएल आणि हेडलॅम्प वॉशर देण्यात आले आहेत. हेडलॅम्प वॉशर्सच्या वैशिष्ट्यांसह येणारी ही एसयूव्ही सेगमेंटमधील पहिली एसयूव्ही आहे. एसयूव्हीचे इंटीरियरही पूर्णपणे काळे ठेवण्यात आले आहे. याशिवाय यात यूएसबी पोर्ट, ऑटो एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत.
इंजिन – (Auto Expo 2023)
मारुतीच्या या जिमनीमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 6,000rpm वर 101bhp आणि 4,000rpm वर 130Nm टॉर्क निर्माण करते. मारुतीने इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडले आहे. मारुती जिमनीला 40 लिटर क्षमतेची इंधन टाकी मिळते.
कोणकोणत्या कलर मध्ये मिळणार –
गाडीच्या कलर व्हेरियंटच्या (Auto Expo 2023) बाबतीत सांगायचं झाल्यास, मारुती सुझुकी जिमनी ड्युअल टोन आणि सिंगल टोन कलरसह तुम्ही खरेदी करू शकता . यातील सिंगल टोन कलर मध्ये पर्ल आर्क्टिक व्हाइट, ब्लश ब्लॅक, नेक्सा ब्लू, ग्रेनाइट ग्रे, सिझलिंग रेड हे पर्याय मिळतात. तर ड्युअल टोन मध्ये सिझलिंग रेड आणि ब्लूश ब्लॅक या रंगाचे पर्याय मिळतील.
किंमत-
मारुती सुझुकीने अद्याप मारुती जिमनी 5 डोअरची किंमत जाहीर केलेली नाही परंतु रिपोर्टनुसार, कंपनी 10 ते 12 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च करू शकते. या गाडीचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. ग्राहक नेक्सा डीलरशिपला भेट देऊन किंवा घरी बसून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन बुकिंग करू शकतात.