हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील ऑटोमोबाइल (Auto Expo 2023) जगतातील सर्वात मोठा इव्हेंट असलेला Auto Expo 2023 यंदा 13 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या इव्हेंट मध्ये आपल्याला एकामागून एक दमदार गाड्या पाहायला मिळतील. या इव्हेंट मध्ये MG मोटर इंडिया अधिकृतपणे आपली MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक लाँच करणार आहे. एमजी मोटर इंडियाने या इलेक्ट्रिक हॅचबॅकचा टीझर रिलीज केला आहे. इव्हेंटच्या ठिकाणी हॉल क्रमांक 15 मध्ये ही गाडी प्रदर्शित केली जाईल.
काय आहेत वैशिष्ट्ये-
MG4 हॅचबॅकबद्दल बोलायचे (Auto Expo 2023) झाल्यास, या EVला शार्प आणि स्लीक डिझाइनसह स्वीप्ट-बॅक हेडलाइट्स बम्परच्या दोन्ही बाजूला मिळतात. यामध्ये हेडलाइट्सच्या खाली उभे फॉग लॅम्प आणि हेडलाइट्सच्या मध्ये मोठा MG बॅज असेल. MG इलेक्ट्रिक हॅचबॅकमध्ये, तुम्हाला OTA अपडेटसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, 360-डिग्री कॅमेरा, हवेशीर फ्रंट सीट्स, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, LED लाइटिंग इत्यादी वैशिष्ट्ये मिळतील.
450 किमी रेंज – (Auto Expo 2023)
UK मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या MG4 EV बद्दल बोलायचे झाल्यास, यात 64kWh बॅटरी पॅक आणि एक मोटर मिळते जी 164.7 bhp किंवा 198.2 bhp जनरेट करते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही इलेक्ट्रिक हॅचबॅक तब्बल 450 किमीची रेंज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या गाडीची 64kWh ची बॅटरी 7kW AC फास्ट चार्जरने 7.5 तास ते 9 तासांत पूर्ण चार्ज केली जाऊ शकते, तर 150kW DC चार्जर वापरून ती जवळपास 35 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.
5-स्टार सुरक्षा रेटिंग-
गाडीच्या सुरक्षेबाबत बोलायचं झाल्यास, MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक मध्ये सेक्युरिटी साठी ड्रायव्हर अटेंशन अलर्ट, लेन कीप असिस्ट, हाय बीम असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, अॅक्टिव्ह इमर्जन्सी ब्रेकिंग, स्पीड लिमिट असिस्ट यासारखी वैशिष्ट्ये आहेत. या इलेक्ट्रिक गाडीला अलीकडेच युरो NCAP क्रॅश टेस्टिंग मध्ये 5-स्टार सेक्युरिटी रेटिंग प्राप्त केले आहे.
किंमत किती –
SE, SE लाँग रेंज आणि ट्रॉफी लाँग रेंज या ३ ट्रिम मध्ये ही इलेक्ट्रिक गाडी मिळते. MG मोटर भारतात ZS EV हे मॉडेल विकत असून याची किंमत कंपनीने 22.58 लाख रुपये ठेवली आहे. यंदा 13 ते 18 जानेवारी या वेळेत ऑटो एक्सपोमध्ये (Auto Expo 2023) ही इलेक्ट्रिकल गाडी प्रदर्शित केली जाईल.
हे पण वाचा :
Auto Expo 2023 Dates : भारतातील सर्वात मोठा Automobile Event; कधी अन् कुठे? तिकीटही पहा
Mahindra Thar : आता मिळणार अगदी स्वस्तात; गाडीच्या फिचर्समध्येही होणार बदल
लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज
Volkswagen Tiguan Exclusive Edition भारतात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत