हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडिया म्हंटल की लोक व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी काहीही करतात. कोणी सायकलचे रूपांतर गाडीत करते तर कोणी रंगांचा वापर करून नवीन कलाकृती सादर करतात. पण तुम्ही कधी कोणाला ऑटोरिक्षाचे रूपांतरन स्कॉर्पिओत करताना पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल की, असं कस शक्य आहे. तर सध्या याबाबत सोशल मीडिया वर व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याचबद्दल जाणून घेऊयात.
व्हिडीओ बघून आनंद महिंद्रा झाले चकित
ऐकावं ते नवलंच असत. अनेकजण पोटापाण्यासाठी रिक्षा चालवतात. त्यासाठी आपल्याला रिक्षात प्रवाश्याने बसावे यासाठी ते काय नाही करत. असाच एक प्रयोग एका व्यक्तीने केला आहे. ऑटोचे स्कॉर्पिओमध्ये रूपांतर केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रादेखील चकित झाले आहेत.
https://www.instagram.com/reel/Cy6EPHIMUiH/?igshid=MWk2bHJpeWtjcG0xeA==
मनीष तायगी या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 472k लाईक आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सुरीवातीला एक व्यक्ती स्कॉर्पिओ पुसताना दिसतो. त्यानंतर हळू हळू गाडीची रूप बदलून ती ऑटो रिक्षामध्ये बदलताना दिसून येत आहे. त्यामुळे बघणाऱ्या व्हिव्हरला चांगलाच आश्चर्याचा धक्का बसताना दिसून येत आहे.