आवळा कॅन्डी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली / आवळा कॅन्डी बनवणे अगदी सोपे आहे. आवळा कॅन्डी रोज सकाळी खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. आवळा आरोग्यवर्धक असल्याने तो खाल्ल्यास अनेक फायदे होत असतात.

साहित्य –
१) १ किलो आवळे
२) ७०० ग्रॅम साखर

कृती –
आवळे पाण्यात टाकून शिजवून घ्या. आवळे शिजल्यावर एक चाळणीत कडून पाणी निथळून घ्या. आवळ्यातील बिया कडून घ्या.
बिया काढल्यावर आवळ्याच्या फोडी निघतात.
या फोडी थंड झाल्यावर एक डब्यात घालून वरून त्यात साखर घाला.
साखर घातलेले आवळे कमीत कमी ३ दिवस तो डबा तसाच ठेवा.
साखर आणि आवळे एकजीव होऊन हळूहळू रस तयार होईल. साखरेचा गोडवा हळूहळू आवळ्यांमध्ये शोषला जाईल.
एक किंवा दोन दिवसात त्याला हळुवारपणे हलवा म्हणजे आवळे पूर्णपणे रसात मिसळतील.
३ दिवसांनतर आवळे एका चाळणीत ठेवून गाळून घ्या ज्यामुळे आवळ्यापासून राहिलेला रस वेगळा होईल.
हा रस वेगळा केल्यावर आवळा शरबत बनविताना वापरू शकतात.
एका मोठ्या ताटात आवळे ठेऊन उन्हात कमीत कमी २ ते ३ दिवस वाळवू शकता. जेव्हा ते कुरकुरीत होतील तेव्हा बाटलीत भरा.

 

( टीप – आवळ्याच्या फोडी काढल्यावर जो साखरेचा पाक खाल्ली उरतो तो रोज सकाळी एक चमचा पिल्याने पित्त कमी होण्यास फायदेशीर ठरते. )

इतर पदार्थ –

रवा आप्पे

कैरीचे पन्हे

दहीवडा

Leave a Comment