Saturday, January 28, 2023

कोरोना संकटामध्ये CAAविरोधी आंदोलकांना अटक; जावेद अख्तर यांची गृह मंत्रालयावर टीका

- Advertisement -

मुंबई । एकीकडे देशातील नागरिक आणि सरकार कोरोनानं त्रस्त असताना, दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलकांना अटक करण्यावरून लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे. ‘देश करोना आणि त्याच्याशी निगडीत समस्यांशी झुंजत असताना गृह मंत्रालय सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात व्यग्र आहे’ असं ट्विट करत जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर ताशेरे ओढलेत.

देशभरात करोना संक्रमणाचे १ लाख ४५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लाखो स्थलांतरीत मजूर आजही रस्त्यावरून चालत जाताना दिसत आहेत. परंतु, या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या जाफराबाद भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील (CAA) आंदोलनात सहभाग घेणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे याचवरून जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयाच्या कार्यशैलीवर रोष व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मागच्या शनिवारीही सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्या जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांचीही धरपकड सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”