नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीची टाळाटाळ

औरंगाबाद : दरवर्षी मुसळधार पाऊस पडल्याने खरीप हंगामीतील पिकांचे नुकसान होत असते. असेच गेल्या वर्षी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. आणि त्यांनी नुकसान भरपाईसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायलात धाव घेतली.

या प्रकरणात न्या. एस. व्ही. गंगापूवाला आणि न्या. एम. जी शेवलीकर यांच्या खंडपीठाने विमा कंपनी राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली 18 ऑगस्ट रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नवनाथ शिंदे यांच्यासह तीन तालुक्यातील शेतकऱ्यांनी अॅड संजय बापट यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्या पंचनाम्यानंतर सरकारने नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. मात्र विमा कंपनीने मात्र नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. विमा कंपनीने नुकसान झाल्यानंतर 72 तासांमध्ये वैयक्तिक तक्रार अर्ज करणे आवश्यक असल्याचे कारण सांगून नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोर्टात सदर याचिका दाखल केली आहे. जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाणे 52 टक्क्यांच्या पुढे आहे त्यामुळे वैयक्तिक पंचनामे न करता सरसकट अनुदान देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.