औरंगाबाद – एमजीएम स्कूल ऑफ फिजीओथेरपी च्या वतीने जागतिक दिनानिमित्त टोणगाव येथे 30 ऑक्टोबर रोजी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
यावेळी न्यूरो फिजिओथेरपीचा विद्यार्थ्यांनी कार्यालय बद्दल पथनाट्य सादर करून लोकांना या आजाराची माहिती दिली. प्यारालीसीस चा झटका आल्यानंतर त्वरित काय केले पाहिजे. तसेच या वेळेला इतके महत्त्व का आहे, नागरिकांनी दैनंदिन आहार आणि व्यायाम कसे बदल केले पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती या पथनाट्याद्वारे देण्यात आली.
यावेळी डॉ. पूजा मोटार, डॉ. पूजा महासेथ, डॉ. सत्यम बोधाजी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रेरणा दळवी, डॉ. रिंकल मालानी यांचे मार्गदर्शन लाभले.