जगजागृती : कराड नगरपालिकेने उभारला “वन्य सेल्फी पाॅंईट”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपालिकेने पालिकेत रिकाम्या भिंतीवर वन्य सेल्फी पाॅंईट तयार केला आहे. वन्य प्राण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेने हा सेल्फी पाॅंईट तयार केला आहे. नागरिक सेल्फी काढण्यासाठी येत असून पालिकेने विनावापरात असलेला जागेचा योग्य वापर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

कराड नगरपालिकेने काही दिवसापूर्वी माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण या अन्य स्पर्धेतही यशस्वी कामगिरी केली आहे. पालिकेकडून शहरातील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ व पर्यावरण पूरक वस्तू तयार केलेल्या आहेत. पालिकेचे कर्मचारी व अधिकारी नेहमीच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. काही दिवसापूर्वी हत्ती, मासा टाकाऊ वस्तूपासून तयार केला होता.

वन्यप्राण्यांच्या जनजागृतीच्या उद्देशाने कराड नगरपालिकेने पालिकेच्या आवारात रिकामी असेलेल्या भिंतीवर वन्य सेल्फी पाॅंईट तयार केला आहे. या पाॅंईटवर वाघाचे चित्र काढण्यात आले आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वन्य सेल्फी पाॅंईटजवळ फोटो काढून आनंद घेतला. विनावापरात असलेल्या भितींचा चांगला वापर पालिकेने केला असल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment