हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्या मध्ये भव्यदिव्य राममंदिर उभारणी करण्यात आली आहे. अयोध्यामध्ये बांधण्यात आलेल्या नवीन मंदिरात प्रभू श्रीरामाची २२ जानेवारीला प्राणप्रतिस्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी देशपातळीवर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्ती मंदिरात स्थापन केली जाणार आहे. या आयोजित कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून कार्यक्रमासाठी लोक अयोध्येत जमा होत आहेत. परंतु रेल्वे विभागाने अयोध्येसाठी जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे भक्तांध्ये नाराजी दुसून येत आहे. आता या गाड्या का रद्द करण्यात आल्या ते जाणुन घेऊयात.
७ दिवसांसाठी रेल्वेने गाड्या केल्या रद्द
सध्या रेल्वे लाईनचे काम सुरु आहे रेल्वेचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या 16 ते 22 जानेवारी या कालावधी दरम्यानच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वेने अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशीयांची गर्दी व होणारी गैरसोय यामुळे अधिकच्या रेल्वे सोडण्यात आल्या होत्या मात्र आता त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 139 वर जावून अधिक माहिती मिळवू शकता. किंवा enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटवर जावून माहिती मिळवू शकता.
कोणत्या गाड्या झाल्या रद्द?
अयोध्येसाठी वंदे भारतसोबत इतरही गाड्या चालवल्या जाणार होत्या. परंतु रेल्वेच्या कामामुळे वंदे भारतसह एकूण 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच दून एक्सप्रेससह असलेल्या 35 गाड्या दुसऱ्या रुळावर वळवण्यात येणार असून इतर 14 रेल्वेचेही मार्ग वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे जरी या गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी रामभक्तांना दुसऱ्या मार्गाने आयोध्येला जाता येणार आहे.