अयोध्येत दिपोत्सव; राम मंदिर भूमिजनाला पंतप्रधान उपस्थित राहणार- योगी आदित्यनाथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अयोध्या । अयोध्येत ४ आणि ५ ऑगस्टला दिपोत्सव होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजन सोहळ्याला येणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. योगी आदित्यनाथ हे आज सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व प्रथम राम जन्मभूमी येथे प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. यानंतर हनुमान गढी येथे रामभक्त हनुमानाचे दर्शन घेतले.

योगी आदित्यनाथ यांनी यानंतर अयोध्येतील खासदार आणि आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठीकाल श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी हे ५ ऑगस्ट होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी येणार आहे. आम्ही अयोध्येतील राम मंदिर जगाती सर्वात सुंदर मंदिर असेल आणि ते देशाचा अभिमान असेल. यात स्वच्छतेला सर्वप्रथम प्राधन्य असेल, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

जगाला अपेक्षित आहे अशी सुंदर अयोध्या स्वंयशिस्तेने उभारण्याची क्षमता आपल्यात आहे. राम मंदिराच्या निमित्ताने ही संधी आपल्याला मिळाली आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आपण एका शुभ कार्यक्रमासाठी एकत्र येत आहोत. हे आपले सौभाग्य आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत ‘दिपोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येतील प्रत्येक घर ४ आणि ५ ऑगस्टला दिव्यांनी उजळून निघेल. दिपावलीचा उत्सव हा अयोध्येशी संबंधित आहेत. अयोध्येचं नाव जुळल्याशिवाय दिपावली होऊ शकत नाही. यामुळे कुणावर कुठलीही टीका-टीप्पणी न करता एक सकारात्मक विचारांनी आपल्याला पुढे जायचं आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment