Ayodhya Ram Mandir | काही महिन्यापूर्वी आयोध्येतील श्री राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असली, तरी मंदिराचे उर्वरित बांधकाम बाकी होते. परंतु सध्या बांधकामाची गती मंदावलेली आहे. कारण या ठिकाणी मजुरांची कमतरता भासत आहे. याबाबत आता राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी या प्रकरणात एक बैठक घेतलेली आहे. आणि राम मंदिर बांधकाम कंपनीला 2024 डिसेंबर पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. यासाठी त्यांना मजूर वाढवण्यात देखील सांगितलेले आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) काम चांगल्या प्रकारे चालू होते. परंतु गेल्या तीन महिन्यापासून या बांधकामाचा वेग हळूहळू कमी झालेला आहे. या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी जवळपास आठ ते नऊ हजार मजूर होते. परंतु त्यापैकी जवळपास निम्मे मजुरांनी काम सोडलेले आहे. त्यामुळे काम करण्यासाठी माणसांची कमी पडत आहे.
या मंदिरात अनेक कामे आहेत. आणि ती वेगवेगळी कामे करण्यासाठी मंदिराच्या ट्रस्टचे शंभर वेंडर युक्त केलेले आहेत. यासाठी वेगवेगळे मजूर देखील ठेवलेले आहे. अशातच आता 30 जुलै रोजी हे मजूर टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी मीटिंग घेऊन चर्चा देखील करण्यात आलेली आहे.
मीटिंग नंतर मिश्रा यांनी सांगितले की, सगळ्यात महत्त्वाचे काम हे मंदिराच्या कळसाचे बांधकाम आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या मुजऱ्यावरील घुमटाच व इतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच कळसाचे बांधकाम पूर्ण होऊ शकतं. सध्याच्या गतीने काम चालू आहे. त्याच गतीने जर काम सुरूच राहिले, तर हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन महिने जास्त लागू शकतात. त्यामुळे आता बांधकाम कंपनीला मजूर यांची संख्या वाढवण्यास देखील सांगितलेली आहे. हे बांधकाम करण्यासाठी आणखी 200 ते 250 कामगार वाढवावे लागणार आहे. अन्यथा डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणार नाही.
सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार ऑडिटोरियम | Ayodhya Ram Mandir
अयोध्येमध्ये ऑडिटेरियम ट्रस्ट कार्यालय आणि साधू संतांसाठी विश्रामगृह बांधण्याचे काम देखील चालू झालेले आहे. हे बांधकाम उत्तर प्रदेश राज्य बांधकाम महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणार आहे. राम मंदिर परिषदेच्या बांधकाम मंडळाला देखील जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ते कार्यालयाचे काम देखील आता पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता ऑडिटोरियमचे बांधकाम देखील 2024 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आलेले आहे.