रामजन्मभूमी परिसरात सापडले मंदिराचे अवशेष; पहा फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राम जन्मभूमी अयोध्या येथे सध्या पूर्वीच्या गर्भगृह स्थळाचे सपाटीकरण करून नवे भव्य राममंदिर बांधण्याची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान कपड्याचे मंदिर हटवून, हळूहळू पूर्वतयारी २० एप्रिल पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने करण्यात येत आहे. दिनांक ११ मे पासून सर्व शासकीय परवानगीसह खोदकामाला सुरुवात करण्यात आली होती. या खोदकामात जमिनीमध्ये काही पुरातन दगड सापडले आहेत. हे दगड म्हणजे मंदिराचे अवशेष सापडले आहेत अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे महासचिव चंपत रे यांनी दिली आहे.

दरम्यान कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करीत हे काम सुरु आहे. सामाजिक अलगाव आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. काम सुरु करण्यापूर्वी सर्व कामगारांचे शारीरिक तापमान देखील तपासण्यात आले होते.  या कामासाठी ३ क्रेन, १ जेसीबी, २ ट्रॅक्टर आणि १० मजूर यांना तैनात करण्यात आले आहे. दर्शनरांगांसाठी लावण्यात आलेले बॅरिकेटिंग हटविण्याचे तसेच सूत्रबद्ध रित्या सर्व सपाटीकरण करण्याचे काम सुरु आहे. हे सर्व सपाटीकरण करून झाल्यावर मंदिर बांधकामाचा मुहूर्त केला जाईल. मात्र हे सर्व देशाच्या स्थितीवर अवलंबून असल्याचे चंपत राय यांनी सांगितले.

११ मे पासून सुरु झालेल्या या खोदकामात अनेक प्राचीन अवशेष सापडले आहेत. यामध्ये मंदिराचे खांब, विविध नक्षीदार दगड, प्राचीन कुआँ मंदिराची चौकट, ७ काळे दगडाचे खांब, ८ लाल मातीच्या दगडाचे खांब, मेहराब चे दगड, देवी-देवतांच्या खंडित मूर्ती, पुष्प, नक्षीदार खांब, कलश आणि शिवलिंग सापडले आहेत. या प्राचीन अवशेषांचे जतन करण्याचाही ट्रस्ट विचार करत आहे. दरम्यान मंदिरनिर्मितीच्या प्राथमिक तयारीचे काम पूर्णतः शासकीय नियमांचे पालन करत सुरु असल्याची माहिती महासचिवांनी दिली आहे.

Leave a Comment