राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच कोरोना महामारी संपेल; मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्षांचं तर्कट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । जगासह भारतात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. देशात आतापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज आढळून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. अशावेळी संपूर्ण जग कोरोना महामारिला नष्ट करण्यासाठी लस शोधण्यात लागलं असताना भाजपाचे नेते व मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी एक अजब दावा केला आहे. “राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाल्यानंतर देशातील कोरोना महामारी संपेल,” असं विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं एएनआयच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरूवात होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी तयारीही सुरू झाली. राम मंदिराच्या उभारणीची चर्चा सुरू असताना भाजपाचे नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“प्रभू रामचंद्रांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी त्यावेळी पूनर्जन्म घेतला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच देशभरात पसरलेली कोरोनाची महामारी नष्ट होण्यासही सुरूवात होईल,” असं शर्मा यांनी म्हटलं आहे. “कोरोनामुळे फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग त्रस्त झालं आहे. आम्ही केवळ सोशल डिस्टन्सिगच पाळत नाही, तर देवांचं नामस्मरणही करत आहोत. राम मंदिर बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिलेले आहेत,” असं शर्मा म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment